Tuesday, October 12, 2010

सुंदर नाजूक उठून दिसेल ती ,
गालावर सुरेखा खाली पाडून हसेल ती ,
करणा नसताना खोटीच रुसेल ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!

एकुलती एक कि सर्वात थोरली असेल ती ,
नाहीतर कदाचित सर्वात धाकटी असेल ती ,
संसार कसा सांभाळेल ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!

फ्याशन करील की संस्कृती पळेल ती ,
परंपरा जोडेल कि परंपरा तोडेल ती,
संसाराचा पसारा कसा आवरेल ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!

थोडी खट्याळ ,नखरेल ,लबाड असेल का ती ,
हुशार समजूतदार सुगरण असेल का ती ,
एक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!

एवढं छोटं आयुष्य सहज जगेल का ती ,
आभाळा एवढं दु:ख सहज सोसेल का ती ,
दु:खातही न तुटता हसेल का ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!

Saturday, October 9, 2010

माझ्या अनेक आठवणींत ती होती....



माझ्या अनेक आठवणींत ती होती
अनेक स्वप्नांत फक्त तीच होती
पण आज नव्हती आठवण नव्हती
जिथे ती मला सोडून गेली…तिथे आज ती आली होती

तिच्या आठवणींत जगत होतो आयुष्य
कोय्रा कागदांचे पुस्तकच बनले ते आयुष्य
पण तिच्या गंधाने ती पाने रंगून गेली
अशा पुस्तकांची गर्दी होती…तिथे आज ती आली होती

ह्र्दयातील स्पंदनं वाढत होती
जणू माझे ह्र्दय तिला हाक मारत होते
पण ती हाक तिला ऐकू आली नाही
कारण तेव्हा ती माझी नव्हती…पण का तिथे ती आली होती?

मन माझे म्हणत होतं नको पाहू तिथे
ह्र्दय माझे सांगत होते पुन्हा तिला जाऊन मिठीत घ्यावे
कोणा कोणाचे ऐकू मी कोणीच काही बोलत नव्हते
आज तिच्या मिठीत मी नव्हतो पण….तिथे आज ती आली होती

मन माझे घट्ट केलं ह्र्दय माझे भरून आले
आतुर होतो मी तिच्या भेटीसाठी
घ्यावे तिला मिठीत व मिटवाव्यात त्या आठवणी
पण तिथे आज ती एकटी नव्हती…पण ती माझ्यासाठी तिथे आज आली होती
किती छान असतं ना ? आपण कुणालातरी आवडणं...

किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं...

कुणीतरी तासनतास आपलाच विचार
करणं....
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...

कुणाच्यातरी पर्सनल डायरित
आपलं नाव असणं ,
चार-चौघात कुणीतरी सतत आपलाच
उल्लेख करणं,
किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं...

कुणीतरी आपलं हसणं
काळजात साठवनं ,
कुणालातरी आपला अश्रू
मोत्यासमान वाटणं...
किती छान असतं ना,
आपण कुणालातरी आवडणं....

कुणीतरी आपल्या फोनची
तासनतास वाट पाहणं ,
आपल्याला एकदा ओझार्त
पाहण्यासाठी ,
तासनतास बस स्टॉप वर उभं राहणं ,
देवसमोरही स्वताआधी
आपलं सुख मागणं ,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...

कुणीतरी डोळ्यात जीव आणून
आपली वाट पाहणं ,
आपल्या उपवासा दिवशी
त्यानं ही हटकून उपाशी राहणं,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...

कुणीतरी आपला विचार करत
पापनीवर पापनी अलगत टेकवनं..
झोपल्यावर मात्र
स्वप्नातही आपल्यालाच पाहणं....
खरच, खूप छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं

प्रेम माझे तू आहेस...





प्रेम माझे तू आहेस , 
प्रेयसी ही तूच आहेस , 
साथ माझी तू आहेस , 
वेड माझे तूच आहेस ... 


तूच माझे बोल , 
माझी कविता तूच आहेस , 
तूच माझे शब्द , 
वाक्य माझे तूच आहेस ... 


रात्र माझी तू आहेस , 
दिवस माझा तू आहेस , 
तूच इन्द्रधनुष्य माझा , 
पावसातही तूच आहेस ... 


देव माझा तू आहेस , 
धर्म देखिल तूच आहेस , 
भाव माझे तू आहेस , 
भावनांतही तूच आहेस ..


पुन्हा तुलाच का गं मी आठवतोय ...





परतू नकोस तू पुन्हा 
जुन्या आठवणी जागवायला,
आधीच खूप दिवस लागलेत 
मनावरील जखमा भरायला.........


दुखः अंतरी दाबून 
एकांतामध्ये रडत असतो,
म्हणूनच का कोणास ठावूक 
सर्वांसोबत हसत असतो.......


आयुष्यात पुन्हा परतू नकोस तू
तुझे स्थान मिळवायला,
आधीच फार वेळ लागलाय 
त्या सर्व आठवणी विसरायला.............


पण ..........
काहीही असले तरीही .................


तुला आणि फक्त तुलाच शोधण्यासाठी
नजर माझी सतत फिरत रहाते,
आकाशीचा चंद्र पाहिल्यावर मनात 
तुझीच आठवण दाटून येत रहाते ............


तुला विसरण्याचा मी 
मनापासून प्रयत्न करतोय,
पण कविता हि लिहिताना 
पुन्हा तुलाच का गं मी आठवतोय .......................

पुन्हा तुलाच का गं मी आठवतोय ... 

दैंवाने कठोर आघात केला
प्रेयसिने प्रेमात 
घात केला

मानुन आपले सर्वस्व अर्पिले
तिने सर्वस्व लुटुन घात केला

शब्दांवर, वचनांवर भाळुन प्रित केली
शब्दांना फिरवुन, वचनांना मोडुन घात केला

गाभा-यात ह्र्दयाच्या प्राणप्रतिष्ठा केली
तिने ह्र्दयमंदिर तोडुन घात केला

डोळ्यांचे ईशारे, नजरेचे बहाणे
नजर फिरवुन घात केला

मखमली केसांच्या सावलीत झोपलो
तिने केसाने गळा कापुन घात केला

माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील ...

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही,
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही,

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन,
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन,

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात

माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील ..

तु मांडलेल्या संसाराची आठवण आज आली...

तु मांडलेल्या संसाराची आठवण आज आली
माझ्या जीवाच्या सगळ्या चिंधड्या करुन गेली……


हेच का प्रेम असते
नाते दोन्ही जिवांचे
पण एकालाच का मरण असते
मरणाच्या चितेवरती आज
आगही ओरडून म्हणाली
कसे जाळू तुला वेड्यारे
तुझी तर प्रेमात राख झाली….
तुझी तर प्रेमात राख झाली….


तु मांडलेल्या संसाराची आठवण आज आली
माझ्या जीवाच्या सगळ्या चिंधड्या करुन गेली……

कसे जगावे कशासाठी
का रडावे कुणासाठी
आसवांचे नाते आता
संपले आहे डोळ्यांसाठी
तुला तर तमा ना भासली कशाची
चांदणी माझ्या प्रेमाची
मलाच अंधारात सोडून गेली….
मलाच अंधारात सोडून गेली….


तु मांडलेल्या संसाराची आठवण आज आली
माझ्या जीवाच्या सगळ्या चिंधड्या करुन गेली……

तुझी वाणी खोट्या शब्दांची
कशाला मी ऐकली होती
तु तर सगळं विकून गेली
ह्या प्रेमाची किंमत अनमोल होती
कुणास ठाऊक तुझी काय मर्जी होती
माझ्या सुखाच्या छायेतसुद्धा
तुझ्या दुराव्याची उन्हं टोचून गेली…….


तु मांडलेल्या संसाराची आठवण आज आली
माझ्या जीवाच्या सगळ्या चिंधड्या करुन गेली……

काय म्हणावे तुझ्या प्रेमाला
बदलत गेले ते घडीघडीला
चार दिवसही ना वाट पाहिली
जिवनाची तुझ्याही वाट लागली
काय मिळाले आता तुला
एक शब्द तु ना काढीला
मला मात्र मुकं करुन गेली.....


तु मांडलेल्या संसाराची आठवण आज आली
माझ्या जीवाच्या सगळ्या चिंधड्या करुन गेली……

अजून आठवतो तो पहिला दिवस...

अजून आठवतो तो पहिला दिवस... 
त्या दिवशी मी तुला प्रथम पाहिलं होतं. कपाळावर थोडे पुढे आलेले मऊ, सरळ केस, शांत नजर, शिडशिडीत बांधा, उमदं व्यक्तिमत्त्व..! 
आमच्या शेजारी राहणाऱ्या तुझ्या नातेवाईकांकडे तू आला होतास. तासाभराने निघून गेलास. हुरहूर मागे ठेवून... 
त्या वेळी माझी गत अगदी 'काय बाई सांगू, कसं गं सांगू?' या गाण्यातल्या मुलीसारखी झाली होती. 

तुझं दुसरं दर्शन मला दिवाळीच्या दिवशी झालं. तू पुन्हा शेजारीच आला होतास. त्या दिवाळीत मी मात्र 
अचानक आलेल्या पावसात जणू चिंब भिजले होते. त्यानंतर तू परदेशात गेल्याचं समजलं. आनंद झाला खरा! पण तुझं दर्शन दुर्लभ होऊन बसलं. ओळख वगैरे तसंच राहिलं. तुझ्यापर्यंत पोहोचणं अशक्य होतं. पृथ्वी गोल आहे. त्यामुळे परत भेट होईल, या आशेवर होते मी! ...

आणि खरंच...

एक दिवस तू अचानक समोर आलास. 
तुला पाहून माझ्या हृदयाची धकधक थांबली जणू. मी काय बघते आहे, करते आहे, शोधते आहे, मलाच कळत नव्हतं. तुझ्या नजरेतून माझी ती स्थिती सुटली नसेल. पण काय करू, माझा स्वत:वर ताबाच राहिला नाही. मी विरघळून जातेय, असंच वाटलं मला. 
हे सगळं माझं एकटीचंच गुपित होतं आजवर. मी कुण्णाकुण्णाला त्याचा पत्ता लागू दिला नाही. आजच मी हे सगळं सांगतेय. अरे, तुझ्या नकळत किती आणि काय काय शेअर केलं मी तुझ्या बरोबर, काय सांगू? देवळातली शांतता, पहाटेचा गार वारा, समुदाकाठचा सूर्यास्त, विजा कडकडताना पडणारा पाऊस, डोंगरमाथा आणि बोटीवरचा डेकसुद्धा! 

गाढवा (हे प्रेमाने हं!) किती रात्री जागवलंस मला. सगळीकडे माझ्या आसपास असतोस. पण खराखुरा नसतोसच. देव सगळीकडे आहे, पण दर्शनाला देवळात जातातच ना? तसंच समज. तुझ्या अस्तित्वाने सगळं सुगंधी होत जातं. तुझ्याशी जोडलेलं हे नातं मी असंच जपणार आहे. तुझी परवानगी न घेता. चालेल ना? सोनेरी क्षणांचा सोबती असूनही अनभिज्ञ असलेला. 
खरोखर गाढव, एक नाही, शंभर!

मला प्रेमात पडायचं...

अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....

अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....

काय करु? काहीच सुचतं नव्हतं....

उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात....

गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन....

थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले....

थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'...

म्हणजे माझ्याच वयाची असेल!

कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल?

आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती?

मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...

तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....

मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'

तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'

मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'

तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!'

मी चकीत झालो!

विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?'

तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे!'

Friday, October 8, 2010

तिच्या नकारानंतर...

तिच्या नकारानंतर...

ख़रच .... हिला वेड लागलय ....


दूर कुठे तरी हरावाल्यासारखी बघते,
हळूच गालातल्या गालात हसते,
नकलतच स्वता:तच गुंतते,
अन त्याचाच विचार करत क्षितिजापार पाहते,
ख़रच ...... हिला वेड लागलय ....

तो नसतानाही त्याच्याबरोबर बोलते,
अन तो समोर नसतानाही त्यालाच ही पाहते,
कुनाशिही बोलताना ह्याचाच विषय असतो,
रात्रंदिन हिच्या स्वप्नात तोच एक राहतो,
ख़रच ...... हिला वेड लागलय ....

ती स्वतःचा नाही त्याचाच विचार करते,
देवाकडे स्वतःच नाही त्याच सुख मागते,
तो समोर असला की त्याच्याशी बोलताच नाही,
सांगा बर, ही न बोलान्याच सोंग घेते की नाही?
ख़रच ....... हिला वेड लागलय ....

आवडतो का तो विचारल्यावर लाडिक हसते,
माहित नाही म्हणुन विषय बदल म्हणते,
गालावरची लाजेची रक्तिमा लपवशील कशी?
त्याच्यावरती प्रेम आहे हे त्याला सांगशील कधी?
ख़रच ....... हिला वेड लागलय ...

मला ही वाटतं कधी कधी...


वाटतं कधी कधी त्या एकट्या
मनाला कुणाची तरी साथ हवी
त्या रडण्याऱ्या डोळ्यांना कुणीतरी
आपल्या हातांनी पुसावं
त्या पहाटेच्या स्वप्नांना खऱ्या
आयुष्याची साथ द्यावी
त्या हरवलेल्या आठवणींना 
एकदा तरी हाक मारावी
त्या गुंतलेल्या आयुष्याला
कधी तरी गुंत्यातुन सोडवाव
त्या स्वप्नातल्या मोडलेल्या घराला
एकदा तरी प्रेमाने बांधाव
त्या घरातल्या अबोल भिंतींशी
कधीतरी एकटेपणात बोलाव
मला ही वाटतं ह्या एकटेपणात 
कधी कधी एकटच कोपऱ्यात बसुन
थोडस रडावं...

Thursday, October 7, 2010

कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये...

कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर हृदय कधी
तर जोडताना असह्य यातना व्हावी ,

डायरित कुणाचे नाव इतकेही येऊ नये
की पनाना ते नाव जड व्हावे
अचानक एक दिवस त्या नावाचे
डायारीत येणे बंद व्हावे ,

स्वप्नात कुणाला असेही बघू नये
की अन्धारताही त्याचे हात असावे,
तुटलेच जर स्वप्न कधी
तर आपल्या हातात काही नसावे,

कुणालाही इतका वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार असावा
एक दिवस आरशात आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा ,

कुणाचे इतकेही एकू नये
की आपल्या कानात त्याच्याच शबदाचा घूमजाव व्हावा
आणि एक दिवस आपल्याच तोंडातून
त्याच शबदाचा उचार व्हावा ,
पण
कुणाच्या इतकेही दूर जाऊ नये
की आपल्या सावली शिवाय आपल्या सोबत काहीच नसावे
दूरदूर आवाज दिला तरी
आपले शब्द  जागीच घुमावेत

कारणं जिव माझा तुझ्यात होता...

..जेव्हां हात तुझा हातात होता
तुझ्यासगे लाबं चालत रहायची
आता घराच्या बाहेर पडत नाही
मन घाबरतं कुठेतरी हरवायची


जेव्हां तुझा हात खाद्यांवर असायचा
मी त्याला आधार समजायची
आता उभी राहताच तोल जातो मझा
धडपडताना तेव्हां तुझा हात धरायची


जेव्हां तु माझ्या जवळ होतास
तेव्हा सारी सुखं माझ्या जवळ होती
आता काटे विखरलेत अगंणात माझ्या
तेव्हां फ़ुल माझ्या दारात होती


जेव्हां तु माझ्या काळजात होतास
तेव्हां आत्मा माझ्या मनात होता
आता मी इथे जिवंत प्रेत झालेय
कारणं जिव माझा तुझ्यात होता...

खरच का प्रेम करण्यासाठी काही कारण लागते ?...

एकदा एक प्रेयसी तिच्या प्रियकराला विचारते,
प्रेयसी : तुला मी का आवडते? तुझं माझ्यावर प्रेम का आहे?
प्रियकर : मला नाही सांगता येत पण माझं खरच तुझ्यावर खूपखूप प्रेम आहे.

प्रेयसी : तुझं जर खरच माझ्यावर येवढं प्रेम आहे तर मग तुला एक साधं कारण
नाही
सांगता येत? छे, मग तु कसा असा दावा करतोस की तुझं माझ्यावर प्रेम आहे?
प्रियकर : खरंच मला नाही सांगता येत की, मी तुझ्यावर येवढं प्रेम का
करतो. पण
तु म्हणतच असशील तर मी तुला सिध्द करून दाखवेन.

प्रेयसी : काय सिध्द करून दाखवणारेस. साधं एक कारण सांगत नाहीस आणि सिध्द
काय
करणार... छे! :(
माझ्या मैत्रिणीचा प्रियकर बघ, तिला किती काय काय सांगत असतो ... तिच्या
सौंदर्याचे किती पूल बांधत असतो आणि तुला साधं एक कारण नाही सांगता येत. :
(

प्रियकर : ठीक आहे बाबा... उम्म्म ... सांगतो तुला, की मी का तुझ्यावर
प्रेम
करतो ...

- कारण तु खूप खूप सुंदर दिसतेस
- तुझा आवाज खूप गोड आहे.
- तु खूप प्रेमळ आहेस, माझी काळजी घेतेस...
- तु खूप सुंदर विचार करतेस
- तुझे हास्य अगदीच लोभस आहे..
- तुझ्या प्रत्येक हालचाली मुळे (अदा : अगदी येग्य वाटते...)

प्रेयसीची कळी आता एकदम खुलते.

काही दिवस आनंदात जातात. आणि असाच एक दुदैवी दिवस उजाडतो. प्रेयसीला
अचानक
अपघात होतो आणि ती कोमात जाते.

प्रियकर तिच्या जवळ येतो. तिच्या बाजुला एक पत्र ठेवतो. त्यामध्ये
लिहिलेले
असते,

प्रिये,

तुझा आवाज गोड होता म्हणुन मी तुझ्यावर प्रेम करत होतो.
पण तु आता बोलू शकत नाहीस. म्हणुन मी आता तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.

तु माझी फ़ार काळजी घ्यायचीस. म्हणुन मी प्रेम करायचो.
पण आता तु माझी काळजी घेवू शकत नाहीस, म्हणुन मी तुझ्यावर प्रेम नाही करू
शकत.

तुझ्या लोभस हास्यामुळे, तुझ्या प्रत्येक गोष्टींमुळे मी तुझ्यावर प्रेम
करत
होतो.
पण आता तु हसु शकत नाही, इकडे तिकडे फ़िरू शकत नाहीस. त्यामुळे मी
तुझ्यावर
प्रेम नाही करू शकत.

जर प्रेम करण्यासाठी काहीतरी कारणच लागत असेल तर मग आता मी तुझ्यावर
प्रेम
करावे असे तुझ्यात काहीच नाही.


खरच का प्रेम करण्यासाठी काही कारण लागते?....

आठवतं अजुनही ....

आठवतं अजुनही ....

आपलं ते...

कॉलेजच्या कँटीनमध्ये भेटणं...



तुझं पुन्हा पुन्हा,

मान वळवून बघणं...

आणि उधारीवर घेतलेल्या...

सिगारेटच्या धुरात,

माझं डोळ्यातलं पाणी दडवणं.



तु विचारलं होतस

का रे? काय चुकलं?

का झालीत अशी ...

आपल्या नात्याची शकलं?



मला तरी कुठे ठाऊक होतं

कुठल्या तरी बेसावध क्षणी...

मनाशी असलेलं..

माझंच नातं तुटलं होतं !



कदाचित तुला ...

गाडीतुन उतरताना पाहुन..

मला माझं ....

पंक्चर झालेली सायकल धरुन..

मैलोनमैल चालणं आठवलं होतं.



पोटापाण्याचा धंदा काय?

तुझ्या बापाचा प्रश्न ऐकुन

सुकलेल्या डोळ्यांसमोर

गळणारं माझं छप्पर दिसलं होतं...



आणि दिसल्या होत्या

सुरकुत्या...

माझ्या मायच्या डोळ्याखालच्या..

माझ्या नोकरीकडे डोळे लावुन बसलेल्या!



तुझ्या मुखचंद्रापेक्षा...

भावंडांच्या ताटातल्या...

भाकरीला मी महत्वाचं मानलं...

तुच सांग...माझं काय चुकलं?