अनोळखी तु जरी ...
ओळखीचे तुझे डोळे.
स्वप्नांत येशी,
कुशीत घेशी
करशी ओठांशी चाळे .....
रेगांळत नसानसातुन
चुकवशी काळजाचा ठोका
मन तरंगत जाई,
घेत क्षितीजावर झोका ....
गज-यात तुझ्या गुरफ़टताना
होती श्वासांच्या लाटा
गळते प्रत्येक पाकळी
फ़ुलवत रोम रोमात काटा ....
मुठीत देशी वादळ
ओठात वीजेचा तडका
कशी भिजावी आग
अन कसा विझावा भडका ....
हवा हवासा वाटणारा
मग उसळून येतो वारा
भिजवुन जाती सरी
अन होतो शांत पसारा ....
अनोळखी तु जरी ...
ओळखीचे तुझे डोळे.
स्वप्नांत येशी,
कुशीत घेशी
करशी ओठांशी चाळे .....