परत कर ते माझे क्षण,
जे तुझ्यासाठी मी घालवले होते.
परत कर ते माझे मन,
जे तुझ्यासाठी कधी झुरले होते.
परत कर ती माझी आसवे,
जेंव्हा तुझ्यासाठी मी रडलो होतो.
परत कर ते माझं स्वप्न,
जे मी तुझ्यासाठी पाहीले होते.
परत कर ते माझं प्रेम,
जे तुझ्यावर मी केले होते.
परत कर ते ह्रदयातले स्पंद,
जे तुझ्यासाठी धडकले होते.
परत जोड ती माझी नाती,
जी मी तुझ्यासाठी तोडली होती.
परत कर तो माझा विश्वास,
जो मी तुझ्यावर खुप ठेवला होता.
परत कर माझ्या आयुष्याचा खेळ,
जो मी तुझ्यासाठीच मांडला होता.
अन् जाता जाता एवढच सांगतो मी तुला,
जमल तर परत कर ते सर्वस्व,
जे मी तुझ्यापाशीच विसरलो होतो.