प्रेमाचा गंध हरवला आहे
पण प्रेम पत्रांचा रंग मात्र अजून तसाच आहे
तुही बदलली आहेस
अन मी पण बदललो आहे
पण आठवणीतला गाव अजून तसाच आहे
जगायची रितच आता वेगळी
रक्ताची नाती पण बदलली
पण रक्ताचा रंग मात्र अजून तसाच आहे
ऋतू आले अन ऋतू गेले
काहींनी आयुष्य माझे सजवले काहींनी उसवले
पण कविता करायचा माझा छंद अजून तसाच आहे
पाउस येईल अन पाउस जाईल
तुझी आठवण येईल न येईल
पण पावसाचा अन माझा याराना अजून तसाच आहे
पाउस येतो वेळी अवेळी,
थंडीही लपली कुठे आभाळी,
पण ओल्या मातीचा सुवास मात्र अजून तसाच आहे....