Friday, November 26, 2010

तुझ्या आठवणी...


तुझ्या आठवणी मनाच्या पुस्तकात
गुलाबाची फूल बनून राहिल्या
जाई जुईचा गजरा माळून
त्या मलाही फुलवत राहिल्या

कधी कंगनांची किणकिण
कधी पैंजणांची छुमछुम
कधी स्पंदनांचे नाद बनून
मनामध्ये वाजत राहिल्या

त्या आठवणींच्या झुल्यावर
मग मी झुलत राहिले
आकाशी उंच झेप घेता घेता
नभीचे चंद्र तारे वेचत राहिले

कुणास ठाऊक काय झाले
आकाशी त्या मेघ दाटून आले
वादळाच्या त्या वावटळीत
सर्व नादच विरून गेले

आता मी आहे आणि तुझी
आठवण आहे
माझ्या विरक्त जीवनात
तेवढीच आता साठवण आहे