Saturday, September 17, 2011

आर्त हाक ...


तुझी करुण आर्त हाक मला कळत का नाही,
पुसून बघ तू आपल्याच मनी,,,,

ते पाणावलेले मृगनयन शोधिसी मजसी
हसू कि रडू कळेना त्या कमल ओठासी,
मज सखे चैन पडेना हे सर्व आठवूनी
पुसून बघ तू आपल्याच मनी,,,,

पोळूनी विरहाच्या तापाने तू हम्बरशी
रडत कोसळशी आपल्याच उशाशी,
तरी दाह काजव्याचा कोण घेई जाणुनी
पुसून बघ तू आपल्याच मनी,,,,

क्षणोक्षणी स्मरशी मज प्रत्येक घासातुनी
जशी उचकी लागे मातेला तानुल्या आठवूनी,
स्मरणी तुझ्या राहुनी जाहलो मी धनी
पुसून बघ तू आपल्याच मनी...
               
                                                    -Subbu

मी नसेन तेव्हा...

मी नसेन तेव्हा स्मरशील का ही सांज सख्या सावळी
मी नसेन तेव्हा आठवतील का कवितेच्या या ओळी

मी नसेन तरीही येशील का एकटाच नदी किनारी
मी नसेन तेव्हा स्मरतील का आपली स्वप्ने सारी

मी नसेन तेव्हा पाहशील का सुकले पिंपळपान
सुंदरशी एक मूर्ती पाहुनी हरपेल तुझे का भान

मी नसेन तेव्हा येतील का रे अश्रू तुझ्या डोळ्यांत
आणुनी नयनी प्राण माझी पाहशील का वाट

मी नसेन तेव्हा मिटुनी घे पापणी भिजलेली
भेटेन तुला मी तुझ्याच जवळी, हृदयी जपलेली

                                                                  -गोजिरी

'कोणासाठी' लिहिणे झाले बंद!...


फुलांचे फुलणे झाले बंद?
वसंत ऋतुचे सजणे झाले बंद?...
कसा चंद्रही अंधाराने व्याकुळ?
आज चांदणे पडणे झाले बंद!...
श्रावणातला पाउस येतो-जातो;
पावसातले भिजणे झाले बंद!...
वाट कुणाची कोणी पाहत नाही;
डोळे लावुन बसणे झाले बंद!...
डोळ्यांमध्ये येतच नाही पाणी
रडणे आणिक हसणे झाले बंद!...
शहरामध्ये अमाप गर्दी झाली;
मनुष्य तरिही दिसणे झाले बंद!...
जमती अड्डे मित्रांचे पण माझे-
तिथले उठणे-बसणे झाले बंद!...


स्वतःशीच मी हितगुज करतो आता
कुणास काही म्हणणे झाले बंद!...
'अजब' मनाला सुचेल ते-ते लिहितो;
'कोणासाठी' लिहिणे झाले बंद!...

                                               -नितेश होडबे