Friday, April 6, 2012

मी तिला विचारले .....

मी तिला विचारले .....


मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,
हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा...

मी विचारले किती गं असे भेटायचे चोरून चोरून,
ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा...

मी म्हणालो आता मला तुझ्या साथीची गरज आहे,
ती म्हणाली त्यासाठी देवासमोर रोज हात जोडत जा...

मी म्हणालो खूप ओझं झालंय एकाकीचं आता,
ती म्हणाली अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत जा...

मी म्हणालो अरे पापण्या ओल्या होतात विरहात तुझ्या,
ती म्हणाली मुखवटे घालून थोडंसं हसत जा...

मी म्हणालो ऋतू सुद्धा माझ्यावर हसतो आहे,
ती म्हणाली अरे मग एक छानसी गझल ऐकत जा...

मी विचारलं असतेस कुठे सध्या तू,
तेव्हा मात्र ती म्हणाली माझ्या श्वासांना तुझ्यातच कुठेतरी शोधत जा..

मी विचारलं हि कुठली रीत तुझी प्रेम करण्याची,
ती म्हणाली अरे प्रेमात कधी असाही एकमेव अनुभव घेत जा..

मी विचारलं आता किती वाट बघायची तुझी सखे,
ती म्हणाली नेहमीच तू तरसवतोस मला आता तू ही तरसून बघत जा..

Thursday, April 5, 2012

परत कर ते माझे क्षण,
जे तुझ्यासाठी मी घालवले होते.
परत कर ते माझे मन,
जे तुझ्यासाठी कधी झुरले होते.
परत कर ती माझी आसवे,
जेंव्हा तुझ्यासाठी मी रडलो होतो.
परत कर ते माझं स्वप्न,
जे मी तुझ्यासाठी पाहीले होते.
परत कर ते माझं प्रेम,
जे तुझ्यावर मी केले होते.
परत कर ते ह्रदयातले स्पंद,
जे तुझ्यासाठी धडकले होते.
परत जोड ती माझी नाती,
जी मी तुझ्यासाठी तोडली होती.
परत कर तो माझा विश्वास,
जो मी तुझ्यावर खुप ठेवला होता.
परत कर माझ्या आयुष्याचा खेळ,
जो मी तुझ्यासाठीच मांडला होता.
अन् जाता जाता एवढच सांगतो मी तुला,
जमल तर परत कर ते सर्वस्व,
जे मी तुझ्यापाशीच विसरलो होतो.

Saturday, March 31, 2012

अगं वेडे, मी तुझ्यावर प्रेम करतो...

ती म्हणाली ......तू मला इतका कसा ओळखतोस,
कितीदा भेटलास मला की, माझ्या साठीच जगतोस....

आपण एकत्र घालवलेले क्षण किती थोड़े होते,
तरी का रात्रं-दिवस तुला माझीच 'आठवण' येते.

नीट पहिलेहि नसशील, तू मला डोळे भरून,
तरी मी छळते तुला का, रोज स्वप्नी येऊन?

हे असं होण शक्य तरी कसं आहे,

नक्की माहित नाही, पण माझीही गत तीच आहे.

मी म्हणालो,..... अगं वेडे...
क्षण एकच पुरे होता, जो तुझ्या मुळे मी जगलो.

अन् कुणी सांगितलं क्षण ते दोघांचे थोड़े होते,
तुझ्या आठवणीने दिवस उगवतो, आठवणीनेच रात्र होते.

येता जाता उठता बसता क्षण न क्षण मी तुझाच असतो,
तुझ्या सवे गं सखये मी, नित्य नवा असा जगतो.

तुला दु:ख होतं तिथे अन्, आसवे मी गाळतो,
तुला लगते ठेच तिथे अन् पाय माझा रक्ताळतो.

तुला वाटेल का बरे हा नित्य माझ्यासाठी झुरतो,
मी म्हणेन अगं वेडे, मी तुझ्यावर प्रेम करतो....:)
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!
जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
कारण त्याला शोधणा-या
तुझ्या नजरेत तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

एक अश्रू..

एक अश्रू..
तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं..
तेव्हा..
तो अश्रू..
हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो..
पण वाहत मात्र नाही,

एक पाऊल..
तुझ्यासाठीच अडखळणारं,
तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं..
वाटेवरल्या एकटेपणात..
तुझी पाऊलखूण शोधणारं..

एक नजर..
जी सारखी तुलाच शोधते...
प्रत्येकाच्या डोळ्यात..
तुझीच छबी शोधते..
मागे वळून ..
पुन्हा पुन्हा..
तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..

एक मिठी..
तुझ्याचसाठी रिकामी..
तुझ्याशिवाय मोकळी..

एक कुंचला..
तुझ्या येण्याकडे लक्ष असलेला..
तू येऊन पुन्हा..
रंग भरशील माझ्या आयुष्यात..
अशी आस लावणारा..

एक जीव..
तडफडणारा..
असहाय्य....
तुझ्याचसाठी....
" तुझ्याशिवाय "....

तो गप्प राहिला...

दोघं एकाच शाळेत आणि मग एकाच कॉलेज मधे होते. इतक्या वर्षांची छान मैत्री होती दोघांची.

ती - दिसायला अतिशय सुंदर, सतत बोलणारी, सतत हसणारी, खूप हुषार.

... तो - अतिशय साधा, गप्प-गप्प राहणारा, अगदी चार-चौघांसारखा.
...
सतत बरोबर असायचे दोघं - अभ्यास, खेळ, सिनेमा, पिकनिक, टाइम-पास - काहीही असो - ना ती कधी त्याला बोलवायला विसरायची, ना तो कधी तिला सोडुन कुठे जायचा.. खरं म्हणजे ती त्याला हक्कानेच बोलवायची.. आणि त्याला तिला सोडुन कुठे एकटं जाणं शक्यच नव्हतं.."अरे! आज मला युनिव्हरसिटीत थोडं काम आहे. येतोस का बरोबर?"

असा नुसता तिचा फोन आला.. आणि तो जेवण अर्धवट सोडुन तसाच बाईक घेऊन तिच्या घरी पोचला. त्याची आई म्हणतच राहिली त्याच्या पाठीमागे, "अरे, निदान जेवण तरी संपव..." पण त्याला कुठे भान होता...

बाईकवर ती नेहमी त्याच्याच मागे बसायची. आणि तो ही दुसऱ्या कुठल्या मैत्रिणीला मागे बसु द्यायचा नाही.

ती दमली असेल तर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायची. तीचे केस वाऱ्यानी उडायचे, हलकेच त्याच्या गालवर

बसुन त्याला गुदगुली व्हायची.

लहानपणापासुनच दोघं एकत्र असल्याने दोघांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं.

तिचं एक स्वप्न होतं - तिला युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल हवं होतं. त्या करता ती मेहनतही तशी घेत होती. तास न तास अभ्यास करत होती. सोबतीला तो बसुन रहायचा. तिला झोप येऊ नये, तिचं concentration राहावं म्हणुन रात्री तिला तिची आवडती कॉफी करुन द्यायचा. तिचा वेळ नको वाया जायला म्हणुन तिच्या करता नोट्स, पेपर्स झेरॉक्स करुन आणायचा.

परीक्षा झाली. निकाल लागले. त्याला फर्स्ट क्लास मिळाला. त्याच्या करता तो खरं जास्तीच होता. आणि ती?

तिचं स्वप्न पूर्ण झालं. तिला गोल्ड मेडल मिळालं..


त्या दिवशी संध्याकाळी ती भेटली त्याला.

हातात एक लाल गुलाबाचं फुल होतं तिच्या.

तो प्रचंड खुष होता - फर्स्ट क्लास करता नाही, तर तिला गोल्ड मेडल मिळालं म्हणुन.

"आज मी खूप खुष आहे. एक गंमत झाली.

तुला विनय आठवतोय? दादाचा बेस्ट फ्रेंड? अमेरीकेला असतो गेले २ वर्ष.

परवाच आला तो १५ दिवसांकरता, आज त्याला कळलं माझ्या रिझल्ट बद्दल. म्हणुन हे गुलाब घेऊन आला मला congratulate करायला. आणि

त्यानी मला चक्क प्रपोज केलं!! म्हणजे पूर्वी तो इथे असताना माझा क्रश होताच त्याच्यावर. पण मला कधी वाटलं नव्हतं की आपलं त्याच्यावर प्रेम असलं तरी तो माझ्याकडे बघेल म्हणुन! मला म्हट्ला की अमेरीकेला मला पुढचं शिकता येईल.

आई-बाबांना सुद्धा तो पटला. त्यांनी पण लगेच हो सांगीतलं. येत्या रविवारी साखरपुडा आहे. त्याला लवकर

परत जायचं आहे ना...म्हट्लं तुला येऊन आधी सांगते.

तुला पण कोणी आवडत असेल, तर तु मलाच पहिलं सांगशील ना?"


तो गप्प राहिला... नेहमी सारखा.. नुसतंच "हं" केलं..

तिचं लक्ष नव्हतंच नाहीतरी.. ती त्या गुलाबाकडेच बघत होती

गेली आहेस दूर आता येऊ नकोस परत...

गेली आहेस दूर आता येऊ नकोस परत...

गेली आहेस दूर आता येऊ
नकोस परत,

आता तुझी वाट पाहण्याची वाटत
नाही गरज..

अशीचं दूर दूर जा घेऊन त्या
हिरव्या आठवणी,

कोमेजुन गेल्यावर त्याना आता घालू
नकोस पाणी..

आता तू चालली आहेस
एकांत प्रवासाला,

किती अलगद तडे दिलेसना गं
माझ्या विश्वासाला..

थांबू नकोस आता वेळ
गेली टळून,

अशी समजू नकोस की माझे
ह्रदय येईल भरून..

तुझ्यासारखाचं मी ही झालो
आता निष्ठुर,

जसा शांत आगीतून निघतो
फक्त धुर..

ती आज मात्र निघून गेली.....

ती आज मात्र  निघून
गेली.....
कधी काळी सदैव माझ्यासोबत
राहणारी,
तर कधी माझ्या नजरेला नजर
देणारी,
ती आज मात्र  निघून
गेली.....
कधी काळी माझ्या खांद्यावर डोके ठेवून
रडणारी,
तर कधी माझ्या स्पर्शानी मोहरून
जाणारी,
ती आज मात्र  निघून
गेली.....
कधी काळी माझा तोल जाताच
मला सावरणारी,
तर कधी इतर मुलीँकडे पाहिले म्हणून
रुसणारी,
ती आज मात्र  निघून
गेली.....
कधी काळी मला आनंदी पाहूऩ
समाधानी होणारी,
तर कधी मला दु:खी पाहून
अश्रु ढाळणारी,
ती आज मात्र  निघून
गेली.....
कधी काळी हा जन्म तुझ्यासाठीच
घेतला असे म्हणनारी,
तर कधी मरेपर्यँत तुझीच राहील असे वचन
देणारी,
ती आज मात्र निघून
गेली.....
कधी काळी मी सिगारेट ओढली म्हणून
अबोला धरणारी,
तर कधी मी दारू प्यालो म्हणून
माझ्याशी भांडणारी,
ती आज मात्र निघून
गेली.....
कधी काळी त्या व्यसनांपासून दूर
रहा असा सल्ला देणारी,
तर कधी त्या व्यसनी मित्रापासून दूर
रहा अशी सक्त ताकिद देणारी,
ती आज मात्र निघून
गेली..

Sunday, February 19, 2012

नको म्हणालो तरी ती गरबा खेळते ...

माझा डोळा चुकवून ती दांडीयाला पळते
तिला हजारदा नको म्हणालो तरी ती गरबा खेळते ....
प्रत्येक दिवशी नविन रंग
तिच्या नटण्याचे नवे नवे छंद ..
मी देवदास गॅलरीत उभा
माझी पारो टीप-यात दंग !..
माझ्या काळजाची घालमेल तिला कुठे कळते ...
तिला हजारदा नको म्हणालो तरी ती गरबा खेळते ....
आज नको जाऊस राणी
हव तर मीच भरतो पाणी..
माझ्या हातात हांडा देउन
ती मेकअप करते शहाणी !..  
आज फ़क्त बघायला जाते म्हणून हळूच घराबाहेर पडते
तिला हजारदा नको म्हणालो तरी ती गरबा खेळते ....
मला गरबा येत नाही
आणी तिचा काही सुटत नाही..
उशीर झाला म्हणून डबा नसतो
ती सकाळी लवकर उठत नाही !.. 
लवकर झोप म्हणालो तर माझी उशी सोफ़्यावर नेउन ठेवते ..
तिला हजारदा नको म्हणालो तरी ती गरबा खेळते ....
कधी कधी मी टिप-या लपवतो
कपाटाच्या किल्ल्या हरवतो ..
नउ दिवस बागडणा-या चंद्राला
मी नजर कैदेत बसवतो !..  
जन्म कैद झाल्यासारखी ती हूंदके देउन रडते ..
तिला हजारदा नको म्हणालो तरी ती गरबा खेळते ....
मी जा म्हणतो दुस-या दिवशी 
नाकावर राग... ऎकेल तरी कशी ..
"मी नाही जात जा " म्हणून
फ़ोडते घरातल्या कपबशी !... 
चंद्र असुनही घरात माझ्या चक्क आमावस्या पसरते
तिला हजारदा नको म्हणालो तरी ती गरबा खेळते ....


अनोळखी तु जरी ...

अनोळखी तु जरी ...
ओळखीचे तुझे डोळे.
स्वप्नांत येशी,
कुशीत घेशी
करशी ओठांशी चाळे .....

रेगांळत नसानसातुन
चुकवशी काळजाचा ठोका
मन तरंगत जाई,
घेत क्षितीजावर झोका ....

गज-यात तुझ्या गुरफ़टताना
होती श्वासांच्या लाटा
गळते प्रत्येक पाकळी
फ़ुलवत रोम रोमात काटा ....

मुठीत देशी वादळ
ओठात वीजेचा तडका
कशी भिजावी आग
अन कसा विझावा भडका ....

हवा हवासा वाटणारा
मग उसळून येतो वारा
भिजवुन जाती सरी
अन होतो शांत पसारा ....

अनोळखी तु जरी ...
ओळखीचे तुझे डोळे.
स्वप्नांत येशी,
कुशीत घेशी
करशी ओठांशी चाळे .....