Jab jab tere paas main aaya, ik sukoon mila
Jise main tha bhoolta aaya, woh wajood mila
Jab aaye mausam gham ke, tujhe yaad kiya
Jab sehme tanha pann se, tujhe yaad kiya
Dil, sambhal ja zara
Phir mohabbat karne chala hai tu
Dil, yenhi ruk ja zara
Phir mohabbat karne chala hai tu
Aisa kyun kar hua, jaanu na main jaanu na
Dil, sambhal ja zara
Phir mohabbat karne chala hai tu
Dil, yenhi ruk ja zara
Phir mohabbat karne chala hai tu
Jis raah pe, hai ghar tera
Aksar wahan se haan main hoon guzra
Shayad yakeen, dil mein raha
Tu mujkho mil jaaye kya pataa
Kya hai yeh silsila, jaanu na main jaanu na
Dil, sambhal ja zara
Phir mohabbat karne chala hai tu
Dil, yenhi ruk ja zara
Phir mohabbat karne chala hai tu
Kucch bhi nahin, jab darmiyaan
Phir kyun hai dil tere hi khwaab bunta
Chaaha ki de, tujhko bhulaa
Par yeh bhi mumkin ho na saka
Kya hai yeh maamla, jaanu na main jaanu na
Dil, sambhal ja zara
Phir mohabbat karne chala hai tu
Dil, yenhi ruk ja zara
Phir mohabbat karne chala hai tu
Dil, sambhal ja zara
Phir mohabbat karne chala hai tu
Murder-2
अनोळखी तु जरी ... ओळखीचे तुझे डोळे... स्वप्नांत येशी, कुशीत घेशी करशी ओठांशी चाळे .....
Thursday, July 14, 2011
पुन्हा पावसालाच सांगायचे...
पुन्हा पावसालाच सांगायचे कुणाला किती थेंब वाटायचे मऊ कापसाने दरी गोठली ढगांनी किती खोल उतरायचे घराने मला आज समजावले भिजूनी घरी रोज परतायचे तुझी आसवे पाझरु लागता खर्या पावसाने कुठे जायचे
गीतकार :- सौमित्र
पहिला पाऊस पहिली आठवण
पहिला पाऊस पहिली आठवण पहिलं घरटं पहिलं अंगण पहिली माती पहिला गंध पहिलं आभाळ पहिलं रान पहिल्या झोळीत पहिलच पान पहिले तळहाथ पहिलं प्रेम पहिल्या सरीचा पहिलाच थेंब पहिला पाऊस पहिलीच आठवण पहिल्या घराचं पहिलच अंगण
गीतकार :- सौमित्र
झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले....
झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले चिंब मनी आज पुन्हा, आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले वार्यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला गंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटपले पाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा खूप जुन्या आज पुन्हा, डोळयात थेंबखुणा होऊनिया धुंद खरे, आज पुन्हा गार झरे येथे झरझरले काही कळया, काही फूले, काही झूले हलले काही मनी, काही तनी, काही नवे फुलले वावरुनी आज कुणी, सावरुनी आज कुणी, येथे थरथरले
गीतकार :- सौमित्र
Sunday, July 10, 2011
गार वारा हा भरारा, नभं टिपूस टिपूस
गार वारा हा भरारा, नभं टिपूस टिपूस रानी वनी, पानोपानी, मन पाऊस पाऊस माती खाली खोल खोल, ओल मातीच्या मनास मातीवर थरथरे, ओला सुवास सुवास पावसाळी पायवाटा, जरा उदास उदास दाही दिशांत पाखरे, जणू आभास आभास रान मोकळे मोकळे, बघे भारुन नभास त्याचा हिरवा हिरवा, आज प्रवास प्रवास
गीतकार :- सौमित्र
बघ माझी आठवण येते का?
मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा बघ माझी आठवण येते का? हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी इवलसं तळं पिऊन टाक बघ माझी आठवण येते का? वार्याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे डोळे मिटून घे, तल्लीन हो नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का? मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये आता नवर्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का? दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं मग चहा कर, तूही घे तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का? मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस पण तुही तसचं म्हणं विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्या शरीराकडे बघ बघ माझी आठवण येते का? यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?
गीतकार :- सौमित्र
Subscribe to:
Posts (Atom)