झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले चिंब मनी आज पुन्हा, आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले वार्यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला गंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटपले पाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा खूप जुन्या आज पुन्हा, डोळयात थेंबखुणा होऊनिया धुंद खरे, आज पुन्हा गार झरे येथे झरझरले काही कळया, काही फूले, काही झूले हलले काही मनी, काही तनी, काही नवे फुलले वावरुनी आज कुणी, सावरुनी आज कुणी, येथे थरथरले
गीतकार :- सौमित्र