अनोळखी तु जरी ... ओळखीचे तुझे डोळे... स्वप्नांत येशी, कुशीत घेशी करशी ओठांशी चाळे .....
पुन्हा पावसालाच सांगायचे कुणाला किती थेंब वाटायचे मऊ कापसाने दरी गोठली ढगांनी किती खोल उतरायचे घराने मला आज समजावले भिजूनी घरी रोज परतायचे तुझी आसवे पाझरु लागता खर्या पावसाने कुठे जायचे
गीतकार :- सौमित्र