गार वारा हा भरारा, नभं टिपूस टिपूस रानी वनी, पानोपानी, मन पाऊस पाऊस माती खाली खोल खोल, ओल मातीच्या मनास मातीवर थरथरे, ओला सुवास सुवास पावसाळी पायवाटा, जरा उदास उदास दाही दिशांत पाखरे, जणू आभास आभास रान मोकळे मोकळे, बघे भारुन नभास त्याचा हिरवा हिरवा, आज प्रवास प्रवास
गीतकार :- सौमित्र