Friday, November 26, 2010

तुझ्या आठवणी...


तुझ्या आठवणी मनाच्या पुस्तकात
गुलाबाची फूल बनून राहिल्या
जाई जुईचा गजरा माळून
त्या मलाही फुलवत राहिल्या

कधी कंगनांची किणकिण
कधी पैंजणांची छुमछुम
कधी स्पंदनांचे नाद बनून
मनामध्ये वाजत राहिल्या

त्या आठवणींच्या झुल्यावर
मग मी झुलत राहिले
आकाशी उंच झेप घेता घेता
नभीचे चंद्र तारे वेचत राहिले

कुणास ठाऊक काय झाले
आकाशी त्या मेघ दाटून आले
वादळाच्या त्या वावटळीत
सर्व नादच विरून गेले

आता मी आहे आणि तुझी
आठवण आहे
माझ्या विरक्त जीवनात
तेवढीच आता साठवण आहे

Wednesday, November 24, 2010

दिल आज शायर है ....

 
दिल  आज  शायर  है , गम  आज  नगमा  है , शब्  ये  गजल  हैं   सनम 
गैरों   के   शेरों  को  ओ  सुननेवाले , हो   इस   तरफ  भी  करम, 

आ  के  ज़रा  देख  तो  तेरी  खातिर , हम  किस  तरह  से  जिए 
आंसू  के  धागे  से  सीते  रहे  हम   जो  जख्म  तूने  दिए  
चाहत  की  महफ़िल  में  गम  तेरा  ले  कर  किस्मत  से  खेला  जवाँ 
दुनिया  से  जीते , पर  तुज  से  हारे , यूं  खेल  अपना  हुआ,

है  प्यार  हम  ने  किया  जिस  तरह  से , उस  का  ना  कोई  जवाब 
जर्रा  थे  लेकिन  तेरी  लौ   में  जलाकर , हम  बन  गए  आफताब 
हम  से  हैं  ज़िंदा  वफ़ा  और  हम  ही  से  हैं  तेरी  महफ़िल  जवान 
हम  जब  ना  होंगे  तो  रो  रो  के  दुनिया  ढूंढेगी  मेरे  निशाँ 

ये  प्यार  कोई  खिलौना  नहीं  है , हर  कोई  ले  जो  खरीद 
मेरी  तरह  जिन्दगी  भर  तड़प  लो , फिर  आना  उस  के  करीब  
हम  तो  मुसाफिर  है , कोई  सफ़र  हो  हम  तो   गुजर  जायेंगे  ही 
लेकिन  लगाया  हैं  जो  दाँव  हम  ने  वो  जीतकर  आयेंगे  ही... 
वो  जीतकर  आयेंगे  ही...वो  जीतकर  आयेंगे  ही...


Thursday, November 11, 2010

पुन्हा प्रेम करणार नाही.....

भेट आपली शेवट्ची असुन
निरोप घेत आहे…
वरुन शांत असले तरी
ह्र्दयात रडत आहे…

जात आहे सोडुन मला
नाही अडवणार मी तुला…
असशील तिथे सुखात रहा
याच शुभेच्छा तुला…

निरोप तुला देताना
अश्रु माझे वाहतील….
काऴजाच्या तुकड्याना
सोबत वाहुन नेतील…

त्या वाहणारय़ा अश्रुतही
प्रतिबिंब तुझेच असेल…
निट निरखुन पहा त्याला
प्राण मात्र त्यात दिसेल…

वाट आपली दुभंगली आता
परत भेटणे नाही…
प्रवास जरी एक आपला
मार्ग एक होणे नाही…

आठवण तु ठॆवु नकोस
मी कधीच विसरणार नाही…
भेटणे तुझे अशक्य तरी
वाट पाहणे सोड्णार नाही…

जाता जाता थोडे तरी…
मागे वळुण पाहाशील का?
प्रत्यशात नाही तरी…
डॊळ्य़ानी बोलशील का?

बोलली नाही तु जरी…
नजर तुझी बोलेल का?
गोधंळलेल्या अत:करणाची…
खबर मला सांगेल का?

नजरेने जरी ओळखलेस तु…
शब्दानीं मी बोलणार नाही
तुझ्या माझ्या आयुष्यात…
नसती वादळ असणार नाही

नेहमीच पराभव झाला तरी….
हक्क तुझ्यावर सांगणार नाही
पण तुझी शपथ
पुन्हा प्रेम करणार नाही…. 

Monday, November 8, 2010

प्रेमाचा ढंग बदलला आहे 
प्रेमाचा गंध हरवला आहे 
पण प्रेम पत्रांचा रंग मात्र अजून तसाच आहे

तुही बदलली आहेस
अन मी पण बदललो आहे
पण आठवणीतला गाव अजून तसाच आहे

जगायची रितच आता वेगळी
रक्ताची नाती पण बदलली  
पण रक्ताचा रंग मात्र अजून तसाच आहे

ऋतू आले अन ऋतू गेले 
काहींनी आयुष्य माझे सजवले काहींनी उसवले 
पण कविता करायचा माझा छंद अजून तसाच आहे

पाउस येईल अन पाउस जाईल 
तुझी आठवण येईल न येईल
पण पावसाचा अन माझा याराना अजून तसाच आहे

पाउस येतो वेळी अवेळी,
थंडीही लपली कुठे आभाळी,
पण ओल्या मातीचा सुवास मात्र अजून तसाच आहे....

Friday, November 5, 2010

खुप छान दिसायचीस तु....

वार्यावर उडणारी बटं सावरताना
खुप छान दिसायचीस तु,
तुझ्या समोर मला गोंधळलेला पाहुन
खुप छान हसायचीस तु.

         नेहमीच मला माझ्या अवतीभोवती
         खरचं भासायची तु,
         मी पाहिलेल्या या स्वप्नातुन जाग
         आल्यावर,कुठेच नसायची तु..

                
माझ्यावरच हसुन झाल्यावर" माझे"
                पुन्हा मला दिसायची तु,
                मी निघुन जायचो तुझ्याकडे पाहत
                जेव्हा खरी-खुरी असायची तु...

Friday, October 22, 2010

रोज तिथे एकांतात रडतो मी...

रोज तिथे एकांतात रडतो मी...
रडायचे नाही म्हणुन खुप अड़लो मी
विसरून जाइन तुला समजून किती रडलो मी
का तूला आठवू... हाच विचार करतो मी
अळव्यावरच्या थेम्बा प्रमाने क्षण क्षण मरतो मी...

नाही कधी जाणार आपण भेटायचो जिथे
मनात माझ्या रोज ठरवतो मी
तुझी अनुपस्तिथि असल्याने जीवनात
रोज तिथे एकांतात रडतो मी...

नको दिसावा तुझा चेहरा
रोज देवास पाया पडतो मी
पाकिटात्ला तुझा फोटो फाड़तान्ना
गलात्ल्या त्या खलीवर रडतो मी...

एकपण वस्तु तुझी का ठेवावी जवळ
म्हणुन कपाटातल्या सरव्या वस्तु काढतो मी
प्रत्येक वस्तु एकदा ह्रुदयाला लाउन
मुक्त कंठाने रडतो मी...

Thursday, October 21, 2010

आठवण माझी कधीतरी येईलच तुला…..


आठवण माझी कधीतरी येईलच तुला, 
तु कदाचीत रडशीलही,हात तुझे जुळवुन ठेव तु, 
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील, 
जो थांबला तुझ्या हातावर,
नीट बघ त्याच्याकडे, 
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल.....
 
माझ्या आठवणी एखदयाला सांगताना, 
तु कदाचीत हसशीलही,
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता,
नीट वापर त्याला, 
अडखळलेला तो शब्द मीच असेल.....
 
कधी जर पाहशील  तु पोर्णीमेच्या चंद्राला,
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील,
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं,
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल.....
 
कधी जर सुटला बेधुंद गार वारा,
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील, 
मध्येच स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुळुक,
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल.
 
आठवण माझी कधीतरी येईलच तुला, 
तु कदाचीत रडशीलही.........

Saturday, October 16, 2010

फक्त मी एकटाच..........

तू होतीस तेव्हा पण, आता तू नाहीस तरी पण.....
राहिलो फक्त मी एकटाच??

हृदयात तुझी आठवण साठवत गेलो,आणि प्रेम मनापासून करत गेलो;
तू क्षणभर पण नजरेपासून दूर होत नाहीस,आणि तुझी वाट पाहत राहिलो;
फक्त मी एकटाच..........

स्वप्नात तुझ येणं-जाणं असायचं, आता तू स्वप्नात येणंही बंद केलस,
आता स्वप्नातही तुझी वाट पाहात राहिलो,
फक्त मी एकटाच..........

रोज सकाळची ती पावणे सहाची बस बाजूने जाताना तुला शोधायचो,
कधीतरी पुन्हा दिसशील या आशेने, रोज धावत जाउन तो स्टॉप गाठायचो;

आजही रोज बाजूने जाणार्या प्रत्येक बसमध्ये, तू दिसशील म्हणून मागे वळून पाहतो,
पण जेव्हा नजरा थांबतात, तेव्हा समजतं तू नाहीस तिथे,

उरतो फक्त मी एकटाच.........

नशा...







भुतकाळ आठवुन जगण्यात एक नशा आहे
आठवणी उगाळुन रडण्यात एक नशा आहे,

दोष हा सारा तुझ्या आठवणींचाच
तुला आठवण्यात एक नशा आहे,

कुणाला शहाणे होउन जगायचे आहे इथे
वेडे होउन तुझ्यावर मरण्यात एक नशा आहे,

मुक्कामाला कोणाला पोहचायचे आहे इथे
तुला शोधता शोधता हरवण्यात एक नशा आहे,

फुलांच्या मागे कुणाला फिरायचे आहे इथे
मोगरा होउन तुझ्या केसांत माळण्यात एक नशा आहे,

दुसर्‍यांचा गझलांचा का घेऊ सहारा इथे
स्वता:च्या शब्दांत प्रेम मांडण्यात एक नशा आहे.

Wednesday, October 13, 2010

माझिया प्रियाला, प्रीत कळेना...


माझिया प्रियाला, प्रीत कळेना...



माझिया प्रियाला, प्रीत कळेना,
अनुराग त्याचा माझा, हाय रे जुळेना...




पावसात भिजतो श्रावण, सुखाचा महीना,
आवरू मनाला कैसे, मला ते जमेना,
मुकी नेत्रभाषा त्याला, कळूनी वळेना,

माझिया प्रियाला, प्रीत कळेना... 

यौवनात सुकते काया, दुःख आवरेना,
वेदना उरीची छेडी मुक्या भावनांना,
स्पर्श गोड अजुनी त्याचा, सुखाचा मिळेना,

माझिया प्रियाला, प्रीत कळेना...



वसंतात नाही बोले, श्रावणात नाही,
कठोरास माझ्या मनिचे, कळेनाच काही,
रात रात शिणती डोळे, पापणी ढळेना,
माझिया प्रियाला, प्रीत कळेना...



माझिया प्रियाला, प्रीत कळेना

अनुराग त्याचा माझा, हाय रे जुळेना...

पैसा मिळवण कठिण आहे.. the best love story...

पैसा मिळवण कठिण आहे.. the best love story...


तुझ्या रुपात मन कैद माझे झाले.
तो कविता वाचत होता.
"गप रे" ति वैतगलीहोती.
जरा सिरीयस हो. २ वर्षे झालीत..
बाबा मागे लागलेत लग्नासाठी..

माझा "हो" कळव.. तो हसत म्हणाला..

"अन काय कळवणार
? तुला ना नोकरी,
ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि."

"अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन
, प्रेम,
एक मेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न."

"वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार,
म्हणजे घर, दुध, किराणा, मुल, म्हणजे पैसा.." ती म्हणाली,

"हातात
हात तुझा, अन तुझी साथ. पैसा येइल.. येतो.." तो म्हणाला,

"पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि.
हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात.." तीनं फटकारल..

"अग पण,,,,," तो बोलायच्या आतच ती म्हणाली..
"पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे..
प्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन पैसा त्याच्या जागि.
तु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार करुन निर्णय दे..."
तिन अल्टिमेटम दिला..

१५ ऑगस्ट चा दिवस होता आज खिशात पैसे होते.
दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता.
त्यान तिला फोन केला.
"बर झाल
, फोन केलास,
मला पण तुझ्याशी बोलायच आहे.." ती म्हणाली.

"नो प्रोब्लेम.. ताज मधे
भेटु काय ?.."
ती उडालीच...


ताजच्या थंडगार वातावरणात, ती सुखावलि होती.
"मग काय ठरल ? " तीनं विषयाला हात घातला.
तो बोलतच नव्हता.
"मी थांबु
शकत नाहि. हि आपली शेवटची भेट.." तिच्या बोलण्याला धार होति..

तो आतुन तुटत चालला होता.."प्लिज.."

"अरे प्लिज काय
सारच कठीण आहे." ती म्हणाली.

"मी निघते
? .."

"प्लीज थांब, मला एक संधी दे.."तो म्हणाला.
"तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो..."तो म्हणाला.

ती खळखळुन हसली. "वेडा रे, अरे पैसा म्हणजे ?..."

"आय नो.. त्यान वाक्य तोडलं.
"किति पैसे
लागतात संसाराला ?"
"लाखो रुपये" ती म्हणाली..
"ठीक आहे. एक डिल..."तो
म्हणाला.
"आपण पुढच्या १५ ऑगस्ट ला आपण इथच, ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु..."
"अन काय करु.."तिनं विचारलं..
"मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल...तुला संसारा साठी...

त्या चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन..."तो हसत म्हणाला.
"मॅड आहेस." पण
म्हणुनच तु मला आवडतो.." ती
म्हणाली,

"पण वचन दे
, वाट पहाशील म्हणुन.. " तो म्हणाला.
"ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि.." ती हसली. .....
continue.....


१५ ऑगस्ट.. तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता.
तेच टेबल होत, मागच्या वर्षीच,
ती ये‌इल
?
तो अस्वस्थ होता
वाजायला आले होते, अन तेवढ्यात ती आत येताना दिसली.
तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला.
हाश हूश करत ती समोरच्या खुर्चीवर बसली.

"कशी आहेस ?"
" फार गरम होत आहे. पहिल पाणी पिते.." म्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली.

ती वाकली असताना
, त्याला ब्ला‌उज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला.
"अग मी मागवतो, म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता.

"अरे फार पाणी पाणी झाल होत.. हं आता बोल..."

"काय बोलु
? तुच सांग.." तिच्याकड बघत तो म्हणाला.
"मग काय ? कुठे आहे ७५ लाख ?" ती हसत म्हणाली..

त्याचा चेहेरा पड्ला होता.

"नाहि जमलं, तु म्हणालीच तेच खर..
७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. पैसा मिळवण कठिण आहे.."

"जा‌उ देत, मला माहित होत.." ती समजावणीच्या स्वरांत म्हणाली.
"मला पण तसचं वाटत होते. पण म्ह्टलं तुला शब्द दिला होता..."

तो बघत होता.."अजुन काय ?" पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला.

"काय सांगु.." ती म्हणालि.. "अरे माझ लग्न झालं
, घरचे मागे लगलेच होते.
तो बॅन्केत आहे, १ बेडरुम च घर आहे... तुझं असतं ??.. "ती म्हणाली.

"सॉरी..
तुझं खरं आहे. तु ठीकचं केलं माझ्याबरोबर.... वायाचं गेलं असतं.." तो म्हणाला..
"ठीक आहे. मी निघते
, तुला आता अस भेटनं बरं नाही..." ती
म्हणाली.

"बरोबर आहे."
तो म्हणाला.

"निघते..." ती म्हणाली..
तो तिच्या पाठमो
~या आकृति कडे बघत होता..

तो बराच वेळ तो बसुन होता. सारं संपल होतं.
रुमच्या नोकरानिनं टॅक्सीत सामान भरलं..

"सर कुठे
?" टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले.

"सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल.
"


टॅक्सी वेगात चालली होति,
गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत.
विमान तळावर टॅक्सी थांबली,
त्यान ट्रॉलीत लगेज भरलं व भाडं देवुन तो निघाला,

"सर..." टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली,
"सर.... तुमची बॅग राहिली आहे.."
त्यानं टॅक्सी ड्रायव्हरकडे बघितलं, अन म्हणाला,
"बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत.
नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि..."

ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता
....


देवा एकाच मागणी
तिची पापणी भरू दे
माझ्या नावाचा एक तरी थेंब
तिच्या नयनी तरु दे..
-
रात अशी ही तंद्रित
पापणिहि बघ लवते आहे
ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे
कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे
-
तुझी आठवण येते तेव्हा
तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो
तु येणार नाहीस माहित असतं
डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..
-
एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल
-
तू समोर असतेस
तेंव्हा बोलू देत नाहीस
तू समोर नसतेस
तेंव्हा झोपू देत नाहीस
-
तो ढग बघ कसा
बरसण्यासाठी आतुरलाय
तुझ्या चिंब गालावरुन ओघळला
म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय
-
माझ्या शब्दांना अजुन तरी
काहीच अर्थ नाही.
जोपर्यंत त्या गीताला
तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.
-
येणारा दिवस कधीच
तुझ्या आठवणीशिवाय जात नाही
दिवस जरी गेला तरी
तुझी आठवण जात नाही.
-
आज सारे विसरली तू
नावही  येई ओठांवर.....
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर......
-
तेव्हा सागर किनारी साक्षीने
तू घेतल्यास किती शपथा.....
किती मारल्यास मिठया तू
तो चंद्र ढगात लपता........
-
नजरेत जरी अश्रू असले
तरी ओठावर हास्य असाव
ओठावरच्या हास्यामागे
नजरेतल्या अश्रूना लपवाव.
-
कसे करू माफ़ तुला
जे घाव तू मला दिले......
घेऊन माझी फूले
तू काटेच मला दिले......
-
डोळे पुसण्यास माझे
पाऊस धावूनी आला,
थेंब कोणता तुझा नि माझा
हेच कळेना म्हणाला.
-
आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो
खोटं खोटं हसताना...
कळलेच नाहीकधी रडु लागलो...
-
तुझ्या नि माझ्या वाटा,
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खर तर,
पण मिटत नाही अंतर
-
मनातला प्रत्येक क्षण
ओठांवरती येईल का?
ओठांवरील प्रत्येक शब्द
मनातच राहील का?