Saturday, October 16, 2010

नशा...







भुतकाळ आठवुन जगण्यात एक नशा आहे
आठवणी उगाळुन रडण्यात एक नशा आहे,

दोष हा सारा तुझ्या आठवणींचाच
तुला आठवण्यात एक नशा आहे,

कुणाला शहाणे होउन जगायचे आहे इथे
वेडे होउन तुझ्यावर मरण्यात एक नशा आहे,

मुक्कामाला कोणाला पोहचायचे आहे इथे
तुला शोधता शोधता हरवण्यात एक नशा आहे,

फुलांच्या मागे कुणाला फिरायचे आहे इथे
मोगरा होउन तुझ्या केसांत माळण्यात एक नशा आहे,

दुसर्‍यांचा गझलांचा का घेऊ सहारा इथे
स्वता:च्या शब्दांत प्रेम मांडण्यात एक नशा आहे.