तू होतीस तेव्हा पण, आता तू नाहीस तरी पण.....
राहिलो फक्त मी एकटाच??
हृदयात तुझी आठवण साठवत गेलो,आणि प्रेम मनापासून करत गेलो;
तू क्षणभर पण नजरेपासून दूर होत नाहीस,आणि तुझी वाट पाहत राहिलो;
फक्त मी एकटाच..........
स्वप्नात तुझ येणं-जाणं असायचं, आता तू स्वप्नात येणंही बंद केलस,
आता स्वप्नातही तुझी वाट पाहात राहिलो,
फक्त मी एकटाच..........
रोज सकाळची ती पावणे सहाची बस बाजूने जाताना तुला शोधायचो,
कधीतरी पुन्हा दिसशील या आशेने, रोज धावत जाउन तो स्टॉप गाठायचो;
आजही रोज बाजूने जाणार्या प्रत्येक बसमध्ये, तू दिसशील म्हणून मागे वळून पाहतो,
पण जेव्हा नजरा थांबतात, तेव्हा समजतं तू नाहीस तिथे,
उरतो फक्त मी एकटाच.........