Thursday, October 7, 2010

कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये...

कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर हृदय कधी
तर जोडताना असह्य यातना व्हावी ,

डायरित कुणाचे नाव इतकेही येऊ नये
की पनाना ते नाव जड व्हावे
अचानक एक दिवस त्या नावाचे
डायारीत येणे बंद व्हावे ,

स्वप्नात कुणाला असेही बघू नये
की अन्धारताही त्याचे हात असावे,
तुटलेच जर स्वप्न कधी
तर आपल्या हातात काही नसावे,

कुणालाही इतका वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार असावा
एक दिवस आरशात आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा ,

कुणाचे इतकेही एकू नये
की आपल्या कानात त्याच्याच शबदाचा घूमजाव व्हावा
आणि एक दिवस आपल्याच तोंडातून
त्याच शबदाचा उचार व्हावा ,
पण
कुणाच्या इतकेही दूर जाऊ नये
की आपल्या सावली शिवाय आपल्या सोबत काहीच नसावे
दूरदूर आवाज दिला तरी
आपले शब्द  जागीच घुमावेत