मला ही वाटतं कधी कधी...
वाटतं कधी कधी त्या एकट्या
मनाला कुणाची तरी साथ हवी
त्या रडण्याऱ्या डोळ्यांना कुणीतरी
आपल्या हातांनी पुसावं
त्या पहाटेच्या स्वप्नांना खऱ्या
आयुष्याची साथ द्यावी
त्या हरवलेल्या आठवणींना
एकदा तरी हाक मारावी
त्या गुंतलेल्या आयुष्याला
कधी तरी गुंत्यातुन सोडवाव
त्या स्वप्नातल्या मोडलेल्या घराला
एकदा तरी प्रेमाने बांधाव
त्या घरातल्या अबोल भिंतींशी
कधीतरी एकटेपणात बोलाव
मला ही वाटतं ह्या एकटेपणात
कधी कधी एकटच कोपऱ्यात बसुन
थोडस रडावं...