Saturday, October 9, 2010

माझ्या अनेक आठवणींत ती होती....



माझ्या अनेक आठवणींत ती होती
अनेक स्वप्नांत फक्त तीच होती
पण आज नव्हती आठवण नव्हती
जिथे ती मला सोडून गेली…तिथे आज ती आली होती

तिच्या आठवणींत जगत होतो आयुष्य
कोय्रा कागदांचे पुस्तकच बनले ते आयुष्य
पण तिच्या गंधाने ती पाने रंगून गेली
अशा पुस्तकांची गर्दी होती…तिथे आज ती आली होती

ह्र्दयातील स्पंदनं वाढत होती
जणू माझे ह्र्दय तिला हाक मारत होते
पण ती हाक तिला ऐकू आली नाही
कारण तेव्हा ती माझी नव्हती…पण का तिथे ती आली होती?

मन माझे म्हणत होतं नको पाहू तिथे
ह्र्दय माझे सांगत होते पुन्हा तिला जाऊन मिठीत घ्यावे
कोणा कोणाचे ऐकू मी कोणीच काही बोलत नव्हते
आज तिच्या मिठीत मी नव्हतो पण….तिथे आज ती आली होती

मन माझे घट्ट केलं ह्र्दय माझे भरून आले
आतुर होतो मी तिच्या भेटीसाठी
घ्यावे तिला मिठीत व मिटवाव्यात त्या आठवणी
पण तिथे आज ती एकटी नव्हती…पण ती माझ्यासाठी तिथे आज आली होती